राजेश कुलकर्णी
नळदुर्ग -: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उस्‍मानाबाद जिल्‍हा उपाध्‍यक्ष तथा श्री स्‍वामी समर्थ अर्बन को-ऑपरेटीव्‍ह बँक लि. नळदुर्गचे संस्‍थापक चेअरमन राजेश रामचंद्र कुलकर्णी (वय 41 वर्षे) यांचा नळदुर्ग येथील राष्‍ट्रीय महामार्गावरील हॉटेल अंकुर शेजारी असलेल्‍या त्‍यांच्‍या राहत्‍या घरी बुधवार रोजी रात्री आठ वाजता मृत्‍यू झाला. मृत्‍यूचे नेमके कारण समजू शकले नाही. ते माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी यांचे धाकटे बंधू होत. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, आई, दोन मुली, भाऊ, वहिणी, बहीण असा मोठा परिवार आहे.
    राजेश कुलकर्णी यांच्‍या पार्थिवावर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता आलियाबाद स्‍मशान भूमीत अंतिम संस्‍कार करण्‍यात आले. यांच्‍या अंत्‍ययात्रेत भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष अनिल काळे, पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे, अर्जुन कदम, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दत्‍ता कुलकर्णी, संघटनमंत्री अविनाश कोळी, विश्‍व हिंदू परिषदेचे धर्म प्रसारक भुजंगराव घुगे, माजी तालुकाध्‍यक्ष प्रभाकर मुळे, जिल्‍हा सरचिटणीस दत्‍ता राजमाने, तालुकाध्‍यक्ष विजय शिंगाडे, माजी पंचायत समिती सदस्‍य महादेव सालगे, अपक्ष नगरसेवक संजय बताले, कॉंग्रसचे नितीन कासार, शहबाज काझी, अमृत पुदाले, राष्‍ट्रवादीचे गटनेते नय्यर जहागिरदार, शिवसेनचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, माजी नगराध्‍यक्ष उदय जगदाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, जिल्‍हा विधीज्ञ मंडळाचे अध्‍यक्ष तथा भाजपचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष अँड. मिलींद पाटील, मनसेचे तालुकाध्‍यक्ष ज्‍योतीबा येडगे, श्री स्‍वामी समर्थ अर्बन बँकेच्‍या चेअरमन सौ. संध्‍या भूमकर, व्‍हा. चेअरमन धिमाजी घुगे, व्‍यवस्‍थापक प्रकाश देशपांडे, बँकेचे सर्व कर्मचारी, प्रतिष्ठित नागरीक सहभागी झाले होते. नळदुर्ग येथील विविध संघटनेच्‍यावतीने व मान्‍यवराच्‍यावतीने राजेश कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्‍यात आली.
 
Top