नळदुर्ग -: पाण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून एकाने एका विवाहित महिलेचा विनयभंग करुन मारहाण केल्याची घटना अलियाबाद (ता. तुळजापूर) येथे सुमारास घडली.
    तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान रविवार रोजी रात्री रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी पाण्याचे टँकर आले होते. सदर टँकरसोबत आलेल्या संजय बाबू माने (वय २0) याने घागरीवरुन टँकर घातल्याने भांडण पेटले. यामध्ये त्याने एका विवाहित महिलेची विनयभंग करुन मारहाण केल्याची फिर्याद त्या विवाहित महिलेने नळदुर्ग पोलिसात दिली. त्यावरुन संजय माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मनगिरे हे करीत आहेत.
 
Top