![]() |
शहबाज काझी |
नळदुर्ग -: येथील नगरपालिकेतील कॉंग्रसचे उपनगराध्यक्ष शहबाज काझी यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे नूतन उपनगराध्यक्ष यांच्या निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
नळदुर्ग नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष शहबाज काझी हे राजीनामा देणार असल्याच्या आवड्या उठत होत्या. पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिल्यावरुन त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी अध्यक्ष व उपाध्यक्षपद प्रत्येकांना दहा-दहा महिने देण्याचे ठरविले होते. करारानुसारच पक्षश्रेष्ठींनी उपनगराध्यक्ष शहेबाज काझी यांना उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार शहबाज काझी यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी आपला राजीनामा जिल्हाधिका-यांकडे सादर केला आहे. दरम्यान यापुढील काळात पक्षश्रेष्ठी आपल्यावर जी जबाबदारी सोपवतील, ती आपण पार पाडू, असेही शहबाज काझी यांनी म्हटले आहे. शहबाज काझी यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नळदुर्गचा नूतन उपनगराध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.