उस्मानाबाद -: राज्याच्या ग्रामीण भागातील गरीबांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या आयुष्यात उपजीविकेसाठीच्या प्रयत्नांतील आशादायी उपक्रमांचा शोध आता घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गंत या नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जीवनमान विकसित करण्यासाठी खाजगी, शासकीय, अशासकीय, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था आदींमार्फत अशा प्रकारचे नवोपक्रम 15 मेपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी या संदर्भात आज जिल्ह्यातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांची बैठक घेऊन त्यांनी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रस्ताव यासाठी पाठविण्याचे आवाहन केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत राबविण्यात येत असलेल्या नवोपक्रम मंच -2013 बाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. केशव सांगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक भोसले यांच्यासह शासकीय अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवोपक्रम मंचासाठी प्रस्ताव पाठवितांना सध्याची वस्तू वा सेवा, प्रक्रिया,, परिस्थितीयांच्याहून भिन्न आणि चाकोरीबाहेरचा असा हा उपक्रम असणे आवश्यक आहे. सामाजिक उद्योजकतेसाठी वातावरण तयार करणे तसेच उपजीविका निर्मितीसाठी नव्या, मापता येणाऱ्या टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणावर करता येण्यासारख्या उपक्रमांना उत्तेजन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. आपल्या जिल्ह्यातही अनेकविध नवनवीन प्रयोग करण्यात आले असून जीवनोन्नती साधण्यात ते यशस्वी झाले आहेत,असे उपक्रम राबविणा-यांनी यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन डॉ. नागरगोजे यांनी केले आहे.
सामाजिक सहभाग, आर्थिक सहभाग, उपजीविका, तांत्रिक नवोपक्रम, माध्यमे व संपर्क यंत्रणा, सार्वजनिक क्षेत्रातील नवोपक्रम, सामाजिक उद्योजकता व समावेशक व्यवसायिक प्रारुपे अशा प्रवर्गात संबंधितांना आपले नवोपक्रम सादर करता येणार आहेत.
या नवोपक्रम उपक्रमासाठी करावयाचा अर्ज www.msrlm.org/mrlif या संकेतस्थळावर तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद येथे उपलब्ध आहे. संबंधितांनी आपले अर्ज mrlif@msrln.org या ई-मेल पत्त्यावर तर हार्ड कॅापी विहित दस्ताऐवजासह महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती नवोपक्रम मंच, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, 101-102, मोनार्च प्लाझा, प्लॅाट नं.56, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांना आपला अर्ज फक्त मराठी वा इंग्रजीतच करता येईल.यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
सर्वोत्तम नवोपक्रमांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रवर्गातील उत्तम नवोपक्रमास आणि परीक्षकांनी निवडलेल्या तीन नवोपक्रमांनाही गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जुनी जिल्हा परिषद इमारत, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा.