उस्मानाबाद -: स्त्री अर्भकांच्या मृत्यूदरात झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन जिल्हास्तरीय तपासणी पथकामार्फत सोनोग्राफी केंद्राची तपासणी करावी. तसेच जिल्हृ्याबाहेर जाणा-या स्त्रीरुग्णांवर काळजीपूर्वक निगरानी करावी व तसे प्रकार आढळून आल्यास गर्भधारणपूर्व व प्रसुतीपूर्व निदानयंत्र कायदयानुसार दोषी सोनोग्राफी सेंटरवर तात्काळ कडक कारवाई करावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे, पीसीपीएनडीटीचे नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय खुने, लोक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.स्मिता शहापूरकर, जिल्हा सरकारी वकील डॉ.व्ही.बी.शिंदे, उपविभागीय अधिकारी वैशाली कडूकर, पीसीपीएनडीटीचे विधी सल्लागार डॉ.उमा गंगणे आदि उपस्थित होते.
       सोनोग्राफी सेंटर सर्वेअर चालू असतानाच एफ फॉर्म भरुन ऑनलाईन काम करणे,  मागील बालकांच्या दोन वर्षातील जन्म व मृत्यूची प्रमाण याबाबत प्रसिध्दी देणे, मतदार स्त्रीयांनी नाव नोंदणी करावी त्यामुळे मतदान करणाऱ्या मतदानात लक्षणीय वाढ होईल, गर्भलिंग निदाना संदर्भातील पुस्तक नोंदणी अद्यावत ठेवणे, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करतांना समान न्याय देणे, स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी जनजागृती करणे, मुलगा व मुलगी समानतेसंबंधी जागृती करणे, रेकार्ड तपासणी करणे, मशीन सील करणे, सोनोग्राफी केंद्राला अचानक भेटी देणे, डिकॉय केसेस करणे, तालुका स्तरावरुन तपासणी केलेल्या नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्राचा आढावा, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या केसेसच्या संदर्भातही  आढावा घेण्यात आला.
      या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
 
Top