नळदुर्ग -: भरधाव ट्रकने मोटारसायकलस्‍वारास जोराची धडक देवून झालेल्‍या अपघातात दोघेजण ठार झाले. त्‍यापैकी एकजण जागीच ठार झाला तर दुस-यास उपचारासाठी नेत असताना वाटेत त्‍याचा मृत्‍यू झाला. हा अपघात सोलापूर-हैद्राबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील इटकळ (ता. तुळजापूर) येथील पोल्‍ट्रीफार्मजवळ झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.
    बंडू महादेव मुळे (वय 35 वर्षे, रा. चव्‍हाणवाडी, ता. तुळजापूर), मल्‍लू चव्‍हाण (वय 22 वर्षे, रा. संगोळजी, ता. अक्‍कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्‍यांचे नाव आहेत. यातील बंडू मुळे व मल्‍लू चव्‍हाण हे दोघे दक्षिण तालुक्‍यातील मुस्‍ती येथून मेहुणीच्‍या हळदीचा कार्यक्रम आटोपून मोटारसायकलवरुन (क्रं. एम.एच. 13, बीइ. 9815) गावाकडे परतत होते. समोरुन येणा-या भरधाव ट्रकने (क्रं. एम.एच 42, बी 0387) मोटारसायकला जोराची धडक दिली. त्‍यात बंडू मुळे याचा जागीच मृत्‍यू झाला तर मल्‍लू चव्‍हाण हा गंभीर जखमी झाला. त्‍याला सोलापूर येथे उपचारासाठी नेत असताना त्‍याचा वाटेतच मृत्‍यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक व क्लिनर फरार झाले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून फरार चालक व क्लिनरचा शोध सुरु आहे.
 
Top