बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: जमीनीचा मालक असल्‍याचे दाखवून त्‍याच्‍या विक्रीचे बनावट दस्‍त तयार करुन फसवणूक करणा-या दोघांना बार्शी न्‍यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
    सहाय्यक निबंधक कार्यालयाच्‍या आवारात दि. 26 सप्‍टेंबर 2011 रोजी ज्ञानेश्‍वर श्रीहरी इंगोले (रा. उपळे दुमाला, ता. बार्शी) व रघुनाथ उर्फ रघुवीर दत्‍तात्रय काटकर (रा. जामगाव, ता. बार्शी) यांनी गट नं. 227 याचे बनावट दस्‍त तयार करुन जागा मालक बबन उर्फ भास्‍कर विवेक देसाई अशी ओळख सांगितली. सदरच्‍या जागेचा व्‍यवहार 6 लाख 60 हजार ठरविला व इसारापोटी 3 लाख 30 हजार रुपये घेऊन खोट्या नोटरी दस्‍ताऐवजावर स्‍वाक्ष-या व अंगठे केले. सदरचा प्रकार लक्षात आल्‍यानंतर दि. 23 सप्‍टेंबर 2011 रोजी यातील फिर्यादी महादेव भिकाजी देशमुख (रा. शिवाजी नगर, बार्शी) यांनी फसवणुकीचा गुन्‍हा नोंद केला.
    सदरच्‍या प्रकरणातील साक्षी पुरावे, स्‍वाक्ष-या, अंगठे जबाब इत्‍यादी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर भक्‍कम पुराव्‍यानंतर यातील आणखी कोणाचे हात आहेत का? सदरची देण्‍यात आलेली रक्‍कम कोणाला दिली, अशा प्रकारचे आणखी काही गुन्‍हे यातील आरोपींनी केले का? यासाठी दोन्‍ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्‍यात आली आहे.
 
Top