पंढरपूर -: राज्यातील उपलब्ध पाण्याचा विचार करता राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्या दिले आहे. त्यानंतर शेतीला. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतक-यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत पर्यायाने पिक पध्दत बदलावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी (जवळा) येथे शिरपूर पध्दतीने बांधण्यात आलेल्या बंधा-यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे होते.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतक-यांनी विहिर पुनर्भरण तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याबात शेतक-यांनी शक्य तेवढे उपाय करावेत. या दुष्काळी परिस्थिती मध्ये शासन शेतक-यांच्या पाठीशी ठाम उभे असून शेतक-यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने एक लाखा पर्यंत शुन्य टक्के दराने तर 1 ते 3 लाखा पर्यंत नाममात्र दोन टक्के दराने पिक कर्ज दिल्याचे सांगून, यंदा नवीन चालू आर्थिक वर्षात शेतक-यांना नवीन विहिर मंजूरीसाठी 3 लाख रुपये मंजूर करण्यात आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी केद्रिंय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या वैभव आलदर यांचा सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आ.दिपक आबा साळुंखे पाटील, तहसिलदार नागेश पाटील, माजी आ.रामचंद्र साळे, जयमाला गायकवाड, जालिंदर लांडे, बाबुराव गायकवाड, तरंगेवाडीचे सरपंच सुरेश गावडे यांच्यासह अधिकारी-पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.