सोलापूर -: जाती विरहीत समाज निर्मितीसाठी सगळयांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता पंधरवडा समारोप, अस्पृश्यता तथा जाती निर्मूलन व्दिसप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अंतरजातीय विवाहीत दांपत्यांचा सत्कार व विशेष व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, आमदार बबन शिंदे, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, कृषी सभापती जालींदर लांडे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने संपुर्ण जिल्हयात समाज प्रबोधनाचे अतिशय उत्तम काम केले आहे. राज्यातील इतर जिल्हा परिषदांनीही याचा आदर्श घेतला पाहिजे. जातपात विरहीत समाज निर्मितीसाठी आणि जाती निर्मुलनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आणि व्यक्तीने सामुहीकरित्या प्रयत्न केला तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते. जिल्हयातील प्रलंबित असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. असा उल्लेखही त्यांनी केला.
सोलापूर जिल्हा भीषण दुष्काळाला तोंड देत आहे. यासाठी सगळयांनीच वृक्षारोपण, पाणीपुरवठा इत्यादी कामे केली पाहिजेत. असे आवाहन त्यांनी केले.
आ. शिंदे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून चालु असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन समाज कल्याण अधिका-यांनी केले.