![]() |
अंकुश कठाळे |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर अंकुश शंकरराव कठाळे हे दि. 4 मे रोजी रुजू झाले. जि.प.प्रा. शाळा शिरुर (ता. शिरुर, जि. बीड) येथून पदोन्नतीवर त्यांची बार्शी बदली झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व शालेय उपक्रमांवर आपण भर देणार असल्याचे त्यांनी पदभार घेतल्यावर म्हटले. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावीने सचिन झाडबुके व सुधीर खाडे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.