बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी नगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांच्या मनमानी कारभारामुळे पुरातन वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.
बार्शी शहरातील सर्व पुतळे एकाच ठिकाणी बसविण्याचा ऐतिहासिक निर्णय म्हणून बार्शी नगरपरिषदेने स्वत:ची पाठ थोपटून घेतली सर्वच्या सर्व पुतळे एका ठिकाणी आणण्यात मात्र अपयश आले व या योजनेसाठी आलेला विशेष निधी मात्र खर्ची पडला. रातोरात शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक पुतळयांना पांढ-या कपडयाने झाकून क्रेनच्या सहायाने हलविण्यात आले. सदरची जागा सर्व पुतळयांना एकत्रित बसविण्यासाठी लहान असल्याची गोष्ट दूर्लक्षित करुन राजकीय अटटाहासाने सदरच्या ठिकाणी पुतळे (छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा वगळून) नेण्यात आले.
सदरच्या जागेवर पुरातन काळातील मोठे वृख होते. सदरच्या वृक्षावर कावळे, पोपट इतरही पक्षी मोठ्या संख्येने दररोज मुक्काम करत होते. परदेशी पाहुणे असलेले दुर्मिळ पक्षी देखील हजारो किलोमीटरचे अंतर पार करुन जवळपास दोन खंड पार करुन आश्रयाला प्रत्येक वर्षी या ठिकाणी हजेरी लावतात. संपूर्ण शहरात अगदोरच वृक्षांची कत्तल मोठ्याप्रमाणात होऊनदेखील डोळेझाक केली जात आहे. नगरपरिषदेत वृक्ष कमिटी नावाची एक कमिटी केवळ अशा वेळी असल्याचा आभास निर्माण केला जातो तर या कमिटीमध्ये ज्यांची नावे घातली त्या वृक्षप्रेमींना कसलीच पुसटशी कल्पनादेखील नसते. दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल केले जाते. सर्वसामान्य लोक हे पाहताना खाकी कपडे घातलेले लोक व सद-यावर बाशभ््र नगरपरिषद हे नाव पाहून त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच केले असेल, असा समज करुन घेतात. मात्र सदरच्या जागी वृक्ष तोडण्यासंबंधी कसलीही प्रक्रिया पूर्ण नसते. सदरच्या वृक्षतोडीवेळी एका वृक्षप्रेमीने वृक्ष का तोडता म्हणून विचारणा केली तर त्याला एका व्यक्तीकडून फोनवरुन धमकविण्यात आले. सदरच्या धमकीनंतरही आपल्या मताशी ठाम राहून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष शिरीष ताटे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केल आहे. वनमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री व सुप्रियाताई सुळे यांनाही सदरच्या प्रकारचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सदरच्या ठिकाणाजवह कोर्ट परिसर आहे. या ठिकाणी असलेल्या वकील व त्यांच्या पक्षकारांनादेखील वर्षानुवर्षे पक्षांच्या किलबिलाटाची सवय झाली आहे. पक्षांच्या दुर्मिळ जाती वरचेवर नष्ट होत असताना बार्शी नगरपरिषदेकडून लाखो पक्षांची घरटू तोडून त्यांचे चिमुकले संसार उध्दवस्त केले आहेत. सदरच्या प्रकारानंतर रात्री अनेक पक्षांनी मोठा किलबिलाट करुन अश्रू गाळले. दुष्काळाची परिस्थिती असल्याने पक्षांची देखील आम्ही किती काळजी घेतो, असा नाटकी पुतना मावशीचे प्रेम दाखवून राष्ट्रवादीतर्फे मागच्या महिन्यातच प्लास्टीकची भांडी वाटली, त्यापूर्वी वृक्षांची रोपे वाटली, पंरतू सध्याच्या वर्तुनकीने त्यांचे पितळ उघडे पडले असून पक्षांचे मित्र नसून त्यांची कत्तल करणारे हे कसाबच आहेत. सदरच्या सत्ताधा-यांमध्ये सर्वच्या सर्व या पापात अथवा कटात सहभागी नसले तरी कोणाच्या तरी एकाच्या डोक्यातून अशा प्रकारच्या कल्पना येतात अन् मनमानी कारभार केला जातो.
सदरच्या जागी असलेले वृक्ष हे किड लागलेले असल्याने त्यांना काढून टाकणे गरजेचे होते, असे त्या वृक्ष तोडणा-या कर्मचा-यांने सांगितले. मात्र त्या ठिकाणी पाहिल्यास काही वृक्षांना किड लागली असली तरी ते आपोआप पडण्यासारखे नव्हते तर अनेक वृक्ष हे अत्यंत टवटवीत न किडलेले होते. एकाने तर पुतळ्यावर पक्षांची विष्ठा पडत असल्याने सांगितले. मात्र पुतळ्यावर विष्ठा पडतू म्हणून त्यांचे संसार उध्दवस्त करणे हे उत्तर नसून त्यावर कसलेतरी छत उभा करणे गरजेचे होते. सर्वसामान्यांनी तक्रार केल्यावर त्याला धमकावणे हे तर त्याहून कहर आहे. कोणी आपल्या कामात अडथळे आणू नयेत व आपल्या मनाला वाटेल तशी आपण सत्ता भोगणावर मीच हिटलर आह, अशा आभासात असलेल्या नगरसेवकांना मात्र जनतेचा रेटा सुरु झाल्यावर पळता भुई थोडी होईल. शहरातील अनेक मुता-या पाडून गैरसोय करणे, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती न करणे, कचरा व्यवस्थापन न करणे, अनियमित पाणीपुरवठा करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा देणे घेणे, मोठ्या संख्येने अधिकारी घरात घुसून कर वसूल करणे, सार्वजनिक स्वच्छतेतील अभाव, डासांच्या संख्येत वाढ, अस्वच्छ पाणीपुरवठा अशा शेकडो प्रश्नांने जनता अगोदरच त्रासली आहे तर आता जनतेसोबत पशू-पक्षी व प्राण्यांचीदेखील तक्रार आहे. माणसांना बोलून आपल्या भावना व्यक्त करता येतात, मात्र या पक्षांनी आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या.