अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट या संस्थेच्या घटना दुरूस्तीला आव्हान देणारे अपील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एच. जोशी यांनी फेटाळून लावले.
1981 मध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची जन्मेजय विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आली. 1999 मध्ये मंडळाने घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. या घटना दुरूस्तीस संजय भागानगरे, शिवशंकर वाले व इतरांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हरकती घेतल्या. बिनबुडयाच्या आरोपामुळे कार्यालयाने घटना दुरूस्तीचा प्रस्ताव नामंजूर केला. त्यावर संस्थापक अध्यक्ष जन्मेजय विजयसिंहराजे भोसले यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले.
जिल्हा न्यायालयाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निर्णय रद्द करुन घटना दुरूस्तीस मान्यता दिली. त्यावर भागानगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करुन त्यात घटना दुरूस्तीस संस्थेच्या कोणत्याही सभा झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे संस्थेचे सभासद हरकतदार आजही सभासद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु या सर्व बाबी फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हरकतदार यांचे सभासदत्व रद्द झाल्याचे मत व्यक्त करुन घटना दुरूस्तीचा जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा आपल्या निर्णयात दिला. मंडळाच्या सर्व सभा वैध असल्याचे म्हटले आहे.
अपिलकत्यातर्फे अँड. गिरीष गोडबोले, अँड. दुपुद पाटील यांनी तर अन्नछत्र मंडळातर्फे अँड. विनीत नाईक, अँड. आय.एम. खैरदी, अँड. नितीन हबीब यांनी कामकाज पाहिले.