उस्मानाबाद -: महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांच्याहस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, श्रीमती शिल्पा करमरकर,ए.जी.मुल्ला, के.ए. तडवी आदिंसह अधिकारी-कर्मचारी,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
     मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आवारातही अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतअसणाऱ्या विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.     
 
Top