नळदुर्ग -: वागदरी (ता. तुळजापूर) येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 122 वी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली असून दि. 30 एप्रिल रोजी सहवाद्य भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, वागदरीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122 व्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 एप्रिल रोजी वागदरी ग्रा.पं. चे सरपंच राजकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर मानवपी हक्क अभियानाचे राजकुमार गायकवाड, भिमशाहीर चंद्रकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुखसिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण, मान्यवरांचा सत्कार व भिमगित गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारी धाडके, दिगदर्शन प्रवीण वाघमारे, साचशिल संस्थेचे संस्थापक राजकुमार वाघमारे आदींचा सत्कार करण्यात आला.
दि. 30 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सहवाद्य भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्साहाची सांगता करण्यात आली. यावेळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत सिध्दार्थ लेझीम संघ येडोळा, भिमक्रांती लेझिम संघ सिंदगाव व भिमसंदेश लेझिम संघ गुजनूर सह युवा कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
वरील सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत वाघमारे यांनी केले. तर सुत्रसंचालन रिपाइं तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड यांनी केले व आभार महादेव वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव मंडळाचे हणुमंत वाघमारे, आण्णासाहेब वाघमारे, तुळशिराम वाघमारे, महादेव वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, मधुकर वाघमारे, संतोष झेंडारे, धम्मदिप बनसोडे, रावसाहेब वाघमारे, हरिदास वाघमारे, विश्वजित मुकदान यांच्यासह मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.