
माणिकराव ठाकरे यांचे सोमवार दि. ६ मे रोजी सकाळी ७ वाजता सिध्देश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी आठ वाजता तुळजापुरात आगमन होणार असून, सकाळी ९.३० वाजता ते अपसिंगा (ता. तुळजापूर) येथील दुष्काळी कामाची पाहणी करतील. आपसिंगा गावात पाणी टंचाई निवारणार्थ युवक काँग्रेस मार्फत जि.प.सदस्य अॅड.धीरज पाटील यांनी दिलेल्या विद्युत पंपाचा लोकार्पण सोहळा यावेळी होईल.
त्यानंतर ठाकरे यांचे सकाळी १० वाजता हाडोंग्री ता.भूमकडे प्रयाण होईल.सकाळी ११.३० वाजता हांडोग्री येथे आगमन झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर यांनी जनावरांसाठी सुरू केलेल्या चारा छावणीस ठाकरे भेट देतील. त्यानंतर शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन आणि १.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेनंतर ठाकरे यांचे उस्मानाबादकडे प्रयाण होईल.
दुपारी ३ वाजता उस्मानाबादेत आगमन झाल्यानंतर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृहात पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांचे सोलापूरकडे प्रयाण होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या या दौ-याची काँग्रेसच्या सर्व आजी आणि माजी पदाधिका-यांनी तसेच प्रमुख कार्यकर्ते आणि विविध सेलच्या पदाधिका-यांनी नोंद घेवून सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.