बीड -: बीड जिल्हयातून उत्तराखंड येथे गेलेल्या अकरा भाविकांचा मृत्यू झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.
    ओमप्रकाश लाहोटी (वय 44), सीमा ओमप्रकाश लाहोटी (40), नम्रमा ओमप्रकाश लाहोटी (वय 19), ऋतुजा ओमप्रकाश लाहोटी (वय 15), वेणू गोपाल लाहोटी (वय 12), विनोद श्रीनिवास लाहोटी (वय 42), ललीता श्रीनिवास लाहोटी (वय 38), ओंकार विनोद लाहोटी (वय 18), राजेश रामप्रकाश झंवर (वय 44), अर्चना रामप्रसाद झंवर (वय 40), अनुजा रामप्रसाद झंवर (वय 11) (सर्वजण रा. परळी-वैजिनाथ, जि. बीड) असे उत्तराखंडात मृत्यू झालेल्या भाविकांचे नावे आहेत.     वरील सर्वजण बीड जिल्हयातील असून एकूण बाराजण होते. यापैकी श्रीनिवास लाहोटी हे जिवंत आहेत. या सर्व मृतांची ओळख पटली असून मृतदेह आणण्यासाठी एक पथक गेले असून सर्व मृतदेह उदया सायंकाळपर्यंत येथे पोहोचतील. त्यांच्यावर उदया सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितली.
 
Top