पंढरपूर -: तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या काळात मुखदर्शनासाठी एकाऐवजी तीन रांगा केल्याने दररोज किमान 50 ते 52 हजार अधिक भाविकांना दर्शन सुलभ होणार आहे. पूर्वीपेक्षा दुप्पट भाविकांना (साडे आठ लाख) दर्शन मिळणार आहे, अशी माहिती श्री विठठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी दिली.
दि. 19 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. नवमीपासून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस म्हणजे दि. 18 जुलैपासून ते एकादशीनंतर पाच दिवस लाखो भाविक श्री विठठलाच्या दर्शनाला येत असतात. म्हणजे दर्शनासाठी गर्दीचा कालावधी यंदा 24 ते 25 जुलैपर्यंत राहणार आहे. मंदिर समितीने अधिकाधिक भाविकांना पदस्पर्श व मुखदर्शन व्हावे, यासाठी नियोजन सुरु केले आहे. यंदा दर्शनासाठी ऑनलाईन बुकींगची व्यवस्था प्रथमच केल्याची माहिती आण्णा डांगे यांनी दिली.
पदस्पर्शाने दर्शन घेणा-यांची संख्या यात्रेच्या कालावधीत रोज 50 ते 52 हजारापर्यंत पोहोचते म्हणजे आषाढी यात्रेच्या कालावधीतील सहा दिवसात तीन लाख भाविक पदस्पर्शाने थेट दर्शन घेवू शकतात. मात्र आषाढीला येणा-या भाविकांची संख्या किमान 12 ते 15 लाखांच्या घरात असते. त्यावर पर्याय म्हणून बहुसंख्य भाविक कळसाचे दर्शन घेवून श्री विठठलाचे दर्शन झाल्याचे समाधान मानतात. त्यापेक्षा मुखदर्शनाची रांग वाढविण्याचा प्रस्ताव मंदिर समितीपुढे होता. त्याबाबत डांगे म्हणाले, एका रांगेतून 25 हजार भाविक मुखदर्शन घेत असत. आता त्याऐवजी तीन रांगा केल्याने दररोज 75 हजार भाविकांना आषाढीच्या कालावधीत मुखदर्शन घेता येणार आहे. ही संख्या सहा दिवसांच्या कालावधीत साडे सात लाख भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. पदस्पर्श तसेच मुख दर्शनासाठी भाविकांनी जास्त वेळ लावू नये, दोन-तीन सेकंदात भाविक पुढे सरकावा म्हणून यंत्रणा उभारली आहे.
आषाढी व कार्तिकी या दोन्ही एकादशींना श्री ज्ञानेश्वर दिंडीला 450 पासेस तर श्री तुकाराम दिंडीला 350 पासेस दिले जातात. मंदिर समितीच्या वतीने यावर्षी श्री विठठलाच्या दर्शनासाठी दोन हजार पासेस छापण्यात येणार आहेत. या वर्षीपासून श्री संत ज्ञानेश्वर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांसह निवृत्तिनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई, एकनाथ आदींच्या पदाधिकार्यांना देखील दर्शन पास देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली.
यावर्षीपासून मंदिर समितीने श्री विठठल दर्शनासाठी ऑनलाईन बुकींगची व्यवस्था केली आहे. आतापासून बुकींग केल्यास दीड ते दोन तासात दर्शन होवू शकेल, अशी माहिती डांगे यांनी दिली आहे. यंदा सात लाखाहून अधिक भाविकांना नुसत्या कळसाच्या दर्शनाऐवजी मुख दर्शनासाठी लाभ घेता येईल, असेही डांगे यांनी स्पष्ट केले.