नळदुर्ग -: येथील बौध्दनगरमध्ये अतिक्रमण करुन राहणा-या दलित व बंजारा समाजाच्या कुटुंबियाचे अतिक्रमण नियमानुसार कायम करण्यात येणार आहे. त्याकरीता नगरपालिकेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून नागरिकांनी त्यास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार व्यंकट कोळी यांनी सांगितले.
नळदुर्ग येथील बौध्दनगरमध्ये रविवार रोजी तहसिलदार व्यंकट कोळी यांनी भेट देवून मागासवर्गीय कुटुंबियाची माहिती घेतली. यावेळी व्यासपीठावर डावीकडून पत्रकार शिवाजी नाईक, तहसलिदार व्यंकट कोळी, नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार, नगरसेवक शहबाज काझी, आरेफ जहागिरदार, विश्वास जनार्धन रणे आदीजण उपस्थित होते.
बौध्दनगरमध्ये (सर्व्हे नंबर 29) दलित व बंजारा समाजाचे नागरीक शासकीय गावठाणवर गेल्या पन्नास वर्षापासून अतिक्रमण करुन वास्तव्य करीत आहेत. बौध्दनगरमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव असून अतिक्रमण धारकांना आजपर्यंत कबाले मिळाले नाहीत. जागा नावावर नसल्याने अनेक शासकीय योजनांपासून येथील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे यांनी पुढाकार घेवून मागासवर्गीय नागरिकांसह जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांची भेट घेवून आपली व्यथा सांगितली. त्यावरुन ना. चव्हाण यांनी तहसिलदार व्यंकट कोळी यांना आदेश दिल्यावरुन त्यांनी नळदुर्ग येथे रविवार रोजी सकाळी दहा वाजता भेट घेवून बौध्दनगर येथील दलित व बंजारा समाजाच्या कुटुंबियाचे ग-हाणे ऐकून घेतले. यावेळी बोलताना तहसिलदार कोळी पुढे म्हणाले की, प्रत्येकी शिधापत्रिका असलेल्या एका कुटुंबास एक गुंठे जमीन शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार असून नगरपालिकेच्यावतीने लवकरच अतिक्रमण धारकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबियानी शिधापत्रिका, शपथपत्र व इतर आवश्यक ते कागदोपत्राची पुर्तता करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी तहसिलदार व्यंकट कोळी यांचा सत्कार बौध्दनगरच्यावतीने विश्वास रणे यानी केले. यावेळी राजेंद्र कांबळे, तुळशीराम रणे, सौ. महादेवी रणे, श्रीमती अनिता जनार्धन रणे, श्रीमती वालाबाई जाधव, फुलाबाई गुरव, संपता कांबळे, ठक्कुबाई गायकवाड, चंदाबाई चव्हाण, अशोक बंजारे, संजय राठोड, नागनाथ कांबळे, राजेंद्र साखरे, परमेश्वर बनसोडे, चंद्रकांत गायकवाड, धनराज वाघमारे, नाना कांबळे, सुनिल भांगे, पप्पू बनसोडे, राम झेंडारे, रहेमान शेख यांच्यासह दलित व बंजारा समाजातील महिला व पुरुष नागरीक मोठया संख्येनी उपस्थित होते.