उस्मानाबाद -: जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी परीक्षेमध्ये उस्मानाबाद येथील जि.प. शाळेतील सहशिक्षक नितीन शामराव घुटे यांनी 77.88 टक्के असे सर्वाधिक गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकाविले आहे. विदयापीठाचा 19 वा दीक्षांत समारंभ शनिवार दि. 29 रोजी होणार असून त्यामध्ये घुटे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत (नाशिक)सन 2012 मध्ये घेण्यात आलेल्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी परीक्षेत उस्मानाबादचे नितीन घुटे यांनी सर्वाधिक गुण (77.88 टक्के) घेऊन ते राज्यात प्रथम आले आहेत. विद्यापीठाचा 19 वा दीक्षांत समारंभ शनिवारी दि. 29 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पदवीदान समारंभामध्ये घुटे यांना ब्लू बर्ड (इंडिया) लि. पुणे यांनी प्रायोजलेले सुवर्णपदक प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.
    घुटे सध्या शहरानजिक असलेल्या काकानगर सांजा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवारातून कौतुक होत आहे. घुटे यांनी यापूर्वी याच विद्यापीठांतर्गत जनसंज्ञापन व पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमामध्ये राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
Top