तुळजापूर -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी फोडून अज्ञात चोरटयानी दोन लाखांचे ऐवज चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटेपूर्वी तुळजापूर येथे घडली. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
    तुळजापूर येथील उस्मानाबाद रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेचे दि. 21 जूनच्या रात्री अज्ञात चोरट्याने शटर उचकटून धाडसी चोरी केली. यावेळी चोरट्यांनी लोखंडी आलमारी, बारा चेकबुक, एफडीचे पावतीबुक असा एकूण 1 लाख 92 हजार 304 रुपयांचा मुद्देमाल चोरुन केला. सोसायटीचे व्यवस्थापक गजानन कराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुल देशपांडे हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
 
Top