तुळजापूर -: तालुक्यात गेल्या आठवडयापासून पावसाने ओढ दिल्याने तुळजापुर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतक-यांनी सुरुवातीस केलेली पेरणी धोक्यात आली असून तालुक्यात केवळ 36 टक्के पेरणी झली आहे. कमी ओलीवर पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
पावसाने यावर्षीही मृग नक्षत्रात दांडी मारली आहे. सुरुवातीस पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिल्याने पिके कोमजून जाऊ लागली आहेत. तुळजापूर तालुक्यात पेरणीसाठी दमदार पावसाची गरज असून यासाठी पेरण्या खोळंबल्या आहे. आजअखेर 36 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक सोयबीनचा पेरा आहे. त्याचबरोबर तूर, उडीद, मुगाचा पेरा केला जात आहे. तालुक्यात सरासरीच्या 86 मिमी पावसाची नोंद झाली आहे.