बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: ढाळे पिंपळगाव (ता. बार्शी) येथून साकत (ता. बार्शी) कडे वाळू घेवून निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
हनुमंत कुबेर क्षीरसागर (वय 20 वर्षे), मुन्ना राजुद्दीन शेख (वय 20 वर्षे) (दोघे रा. साकत, ता. बार्शी) असे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर मच्छिंद्र बाळासाहेब संकपाळ, सचिन दिलीप मोरे (दोघे रा. साकत, ता. बार्शी) असे गंभीर जखमींचे नाव आहेत. गुरुवार दि. 13 मे रोजी रात्री अकरा वाजता हनुमंत क्षिरसागर व मुन्ना शेख हे दोघे तालुक्यातील ढाळे पिंपळगाव येथून जेवण करुन साकत कडे निघाले असता ट्रक्टर क्रमांक एम.एच. 13 ए.जे. 8245 हा वाळू घेवून जात होता. सदरच्या वाहनाला हात दाखवून वरील चौघेजण वाहनाच्या ट्रॉलीत बसले. साकतजवळ आल्यावर असलेल्या वळणावर सदरच्या वाहनाची ट्रॉली पलटी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मच्छिंद्र संकपाळ, सचिन मोरे यांच्यावर उपचार सुरु असून निष्काळजीपणाने वाहन चालविणा-या चालक बालाजी बाळासाहेब मोरे याच्याविरूद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुस-या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. गुरुवारी रात्री अकरा वाजता घडलेल्या या प्रकाराची शुक्रवारी रात्री आठ पर्यंतही नोंद झाली नसल्याने परिसरात वेगळीच चर्चा सुरु होती.
सदरच्या प्रकारावरुन वाळू माफियांच्या गोरखधंद्यावर पोलीस प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याचे, जाणीवपूर्वक डोळेझोक होत असल्याचे दिसून येत आहे.