उस्मानाबाद -: जिल्हयातील सर्व होतकरु सुशिक्षित व अविवाहित तरुणांसाठी भारतीय नौ सेनेमध्ये स्टीवार्ड,कुक व टोपास या ट्रेडच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावरुन डाउनलोड करता येईल तसेच हा अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद यांच्याकडेही उपलब्ध आहे.
उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2014 रोजी 17 ते 21 वर्ष असावे. स्टीवार्ड व कुकसाठी 10 वी पास आणि टोपाससाठी 6वी पास अशी शैक्षणिक पात्रता आहे. तरी भारतीय नौ सेनेमध्ये भरती होऊ इच्छिणा-या जिल्ह्यातील उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स सं. 02, पोस्ट ऑफीस लोधी रोड, नई दिल्ली-110 003 असा आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2013 अशी आहे. तरी जिल्ह्यातील पात्र व इच्छक उमेदवारांनी भारतीय नौ सेनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने भरती होण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.