सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील युवक - युवतींना ट्रायसेम प्रशिक्षण केंद्र, सोलापूर व लघु औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा येथे स्वयंरोजगाराची प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हि.एस. मुळीक, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर यांनी केले आहे.
जिल्ह्यात ट्रायसेम प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार युवक - युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी ट्रायसेम प्रशिक्षण केंद्र, सोलापूर व लघु औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा येथे कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यात 1 जुलै 2013 पासून प्रशिक्षण सत्रासाठी प्रवेश देण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 प्रशिक्षण संस्था कार्यरत असून सोलापूर येथील केंद्रात मोटार रिवायडींग, वेल्डींग व जॉयटींग, रेडिओ, टी.व्ही. दुरुस्ती, नळ कारागीर व करमाळा येथे वायरमन या व्यवसायाच्या प्रशिक्षफणाची सोय आहे.
अधिक माहितीसाठी सर्व पंचायत समिती कार्यालयाकडे, गट विकास अधिकारी अथवा विस्तार अधिकारी (उद्योग) यांच्याकडे संपर्क साधावा.