उस्मानाबाद -: स्व. माणीक (दादा) कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, उस्मानाबाद, साधु वासवानी मिशन आणि बुधराणी हॉस्पीटल,पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसविण्यासाठी लोहिया मंगल कार्यालय, माऊली नगर, तुळजापूर येथे दि. 16 जून रोजी सकाळी 10 ते 2 या कालावधीत मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
      या शिबीरात पोलिओ रुग्णाचे तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार असून नंतर त्यांना कृत्रिम अवयव तयार करुन देण्यात येणार आहेत. हे कृत्रिम अवयव अत्यंत सोपे व पूर्वीप्रमाणे चालण्याचे सर्व कामे करण्यात सोईचे आहेत. अपघात, मधुमेह, रक्तवाहीन्यांचे आजार, गॅगरीन व इतर कारणामुळे पाय काढलेल्या रुग्णांना नवे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. या शिबीराच्या  नोंदणीसाठी खालील संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी.
     पावन हॉस्पीटल (02471)244999, गुरुनाथ बडूरे -9890214350, प्रसाद खामकर -9860226499, पावन ट्रेडर्स-9667645004, महेंद्र कावरे-9822722535, राम पाटील 9823618171, सुजित नाईक -9822884450, आणि अडसूळ, नळदुर्ग-8007842961 असा आहे.तरी जिल्ह्यातील गरजू रुणांनी या शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आर. आर. हाश्मी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top