
अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष कमलकिशोर कदम बोलताना म्हणाले, सन 1984 साली या महाविदयालयात फक्त 105 विदयार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता आणि 1988 साली अभियंता म्हणून ते बाहेर पडले. आज पंचवीसावी बॅच बाहेर पडणार आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. जगाच्या सर्वच देशात एमजीएमचे विदयार्थी उत्कृष्ट कार्ये करत आहेत. अगदी सुरुवातीला मीच प्राचार्य होतो, पुढे हे पद मी डॉ. गीता लाठकर या यांच्याकडे सोपवले. आजपर्यंत लाठकरांनी प्राचार्यपद यशस्वीपणे सांभाळले. शिक्षकांच्या जीवनात विदयार्थ्यांमुळे आनंद येतात, विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रगती करावी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
विदयार्थ्यांना उपदेशपर भाषणात महाविदयालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर बोलताना म्हणाल्या की, विदयार्थ्यांनी गांधीजींच्या सात तत्वांचे पालन करावे, आपापल्या आई व वडिलांचे, गुरुजनांचे आणि महाविदयालयाचे नाव उज्वल करावे असून सांगून एमजीएमचे माजी विदयार्थी चांगल्या पध्दतीने विविध ठिकाणी काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विभागप्रमुख डॉ. दिपक पत्तेवार, डॉ. महेश हरकरे, प्रा. मंगल बनवसकर यांचे मार्गदर्शन भाषण झाले.
याप्रसंगी सर्व उपस्थित विदयार्थ्यांना गांधींजीचे सात तत्वे कोरलेले स्मृतीचिन्ह भेट म्हणून देण्यात आले. तसेच विविध आस्थापनामध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या अंतिम वर्षाच्या अनेक विदयार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ. गोविंद हंबर्डे, डॉ. मुत्तेपवार, प्रमोद कुलकर्णी, युसुफ अली यांच्यासह शिक्षक, शिक्षकत्तेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पंकज पवार, पदमाकर देशमुख, आनंद भांगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी पावडे हिने केले.