उस्मानाबाद -: अनैतिक संबंधाच्या कारणावरून कुर्हाड व वरवंट्याने मारून खून केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील पती-पत्नीस उस्मानाबाद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
गजेंद्र बाबू गोरड, पदमीनबाई गजेंद्र गोरड (दोघे रा. गोरडवस्ती, निलेगाव शिवार, ता. तुळजापूर) असे जन्मठेप झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. यातील पदमीनबाई गोरड याचे गोरडवस्ती येथील संतोष गोरड याच्याशी अनैतिक संबंध होते. दि. 26 डिसेंबर 2011 रोजी रात्री नऊच्या सुमारास गजेंद्र व त्याची पत्नी पदमीनबाई यानी संतोष यास जेवणासाठी घरी बोलावले होते. यावेळी अनैतिक संबंधावरुन त्यांच्यामध्ये वाद निर्माण होवून गजेंद्र व पदमीनबाई यानी संतोषवर वरंवटा व कु-हाडीने हल्ला करुन त्याचा खून केला. याप्रकरणी संतोषचे वडील नागनाथ गोरड यानी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील पती-पत्नीविरुध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शेटकर यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. दाते यांच्यासमोर आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. याच दरम्यान न्यायाधीश दाते यांची बदली झाल्याने हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी यांच्यासमोर आले. यावेळी समोर आलेला पुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी. वाय. जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी गजेंद्र व पद्मिनबाई या गोरड दाम्पत्यास जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी 40 हजार रुपये मृताच्या लहान मुलांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. हा निर्णय 20 जून रोजी देण्यात आला.