पंढरपूर -: वारकरी सांप्रदायात सर्वोच्च मानल्या जाणा-या आषाढी यात्रेत भाविकांना आता केवळ दोन तासात श्री विठठलाचे दर्शन देण्याची महत्वाकांक्षी योजना मंदिर समितीने आखली आहे. यासाठी भाविकांनी दर्शनासाठी मोफत आरक्षण करण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केले आहे.
    राज्यातील भाविकांना या संदर्भातील माहिती व्हावी, यासाठी मंदिर समितीने येणा-या सर्व दिंडया आणि पालखी सोहळयाच्या माहितीची कुपन वाटण्याची तयारी केली आहे. राज्यातील सर्व एसटी बसेसमध्ये ही माहिती देणारे पोस्टर्स लावली जाणार आहेत. याशिवाय राज्यातील सर्व सेतू कार्यालयात याची माहिती व आरक्षण होवू शकणार आहे. यात्रा काळात यंदा सात लाख भाविक याद्वारे झटपट दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था समितीने केली आहे. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. पण दररोज केवळ पन्नास हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येते आणि यासाठी पंचवीस ते तीस तास रांगेत उभे राहावे लागते. दर्शन आरक्षण व्यवस्थेमुळे मात्र केवळ दोन तासात हे दर्शन होणार असल्याने भाविकांचे होणारे हाल कायमचे बंद होणार आहेत.
* सौजन्य प्रहार
 
Top