उस्मानाबाद :- शासकीय अधिकाऱ्यांनी गाव व तालुका पातळीवर जाऊन तेथील दुध उत्पादक संस्था प्रतिनिधींच्या बैठका घेऊन दुध संकलन वाढीसाठी जनजागृती करावी, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
भूम येथील शासकीय दूध योजनेस पालकमंत्री चव्हाण यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. याप्रसंगी विजयसिंह थोरात, अण्णासाहेब देशमुख, विलास शाळू, रोहन जाधव, राजेंद्र शेरखाने, तहसीलदार अहिल्या गाठाळ, दुग्धशाळा व्यवस्थापक एस.टी.पाटील तसेच एन.जे.थावडे, टी.एस. मुळीक, एस.बी. उंदरे आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, मध्यवर्ती दुगध शाळेतील आवश्यक दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करुन मंजूरी घ्यावी, दुध उत्पादकांच्या पैशाचे वाटप वेळेवर करावे तसचे कार्यालयीन कामकाज जलग गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी यावी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तत्पूर्वी त्यांनी दहावीमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहात करण्यात आला.
नुकतेच निधन झालेल्या जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापती भारतीताई पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.