उस्मानाबाद -: अपंग कल्याण आयुक्तालय,पुणे व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी सन 2013-14 या वर्षासाठी 15 ते 35 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. तरी ईच्छूक अपंग मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. 30 जून,2013 पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड (भ्रमणध्वनी क्र. 9960900369,9403201100 आणि 9604951055) यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (हार्डवेअर व कॉम्प्युटराईजड अकाउटींग अँन्ड ऑफीस अँटोमेशन ), वेल्डर कम फॅब्रीकेटर, कंपोजींग प्रिटींग अँन्ड बायडींग, शिवण कर्तन कला, मोटार अर्मीचर रिवायडींग, विद्युत तारतंत्री आदि अभ्यासक्रम आहेत. या संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोयही करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे.