तुळजापूर -: अपसिंगा (ता. तुळजापूर) येथील एका पाच वर्षीय बालकाने घरातील रॉकेल पिल्याने त्याचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. कृष्णा बंडू सरडे असे त्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी राहत्या घरातील बाटलीतील रॉकेल तो पिला होता. प्रथम त्यास तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्याला सोलापूर येथे पाठविण्यात आले. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
Top