तुळजापूर -: कुत्रा बांधण्याच्या कारणावरुन वृद्ध दाम्पत्यास लाकडी दांड्याने मारहाण झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मे) येथे २१ मे रोजी घडली होती. यात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दयानंद वसंत पांचाळ, छायाबाई वसंत पांचाळ व वसंत पांचाळ (सर्व रा. जवळगा, ता. तुळजापूर) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींचे नाव आहे. जवळगा येथील बळी शिवराम लोखंडे (वय ६५) व त्यांच्या पत्नी मंगल बळी लोखंडे यांना २१ मे रोजी लाकडी दांड्याने मारहाण झाली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या बळी लोखंडे यांचा उपचारादरम्यान २४ मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर सदर प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी केलेला तपास व मंगल लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन याप्रकरणात मारहाण करणार्‍या दयानंद वसंत पांचाळ, छायाबाई वसंत पांचाळ व वसंत पांचाळ यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलिसात गुन्‍हा दाखल करण्‍यात असून असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालावलकर या करीत आहेत.
 
Top