उस्मानाबाद :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे डि.जी.ई. टी नवी दिल्ली, केंद्र शासनाने खालील व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. इच्छुक  विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी  ऑनलाईन प्रवेश दि. 8 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्याचे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. एस. गायकवाड यांनी केले आहे.
    एक वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम- सुतारकाम, संधाता, मेसन, फळे व भाज्या संस्करण, फळे व भाज्या संस्करण (अल्पसंख्याक), ड्रेसमेकींग (मुलीसाठी), ड्रेसमेकींग (मुलीसाठी अल्पसंख्याक), हेअर ॲड स्किन केअर (मुलीसाठी), हेअर ड स्किन केअर मुलीसाठी (अल्पसंख्याक), कोपा, डिटीपीओ, सेक्रेट्रीयल प्रॅक्टीस, सीओइ सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत्‍प्रॉडक्शन मॅन्युफॅक्चरींग सेक्टर.
    दोन वर्षाचे अभ्यासक्रम - विजतंत्री, तारतंत्री, यांत्रिक मोटारगाडी, एमआरएसी, एमआरटीव्ही, जोडारी , पेंटर (जनरल), मशिनिष्ट आणि  यांत्रिक विजक हे अभ्यासक्रम असून  या अभ्यासक्रमासाठी व अधिक माहितीसाठी www.dvet.gov.in व www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळाचा वापर करुन आपले अर्ज ऑनलाईन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top