उस्मानाबाद  -: राज्य शासनाचा कृ‍षि विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने  सोमवार दि. 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात जिल्ह्यातील कृषिनिष्ठ शेतक-यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. 
     राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धविकास  व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून खा.डॉ. पद्मसिंह पाटील उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. उस्‍मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या डीपीडीसी हॉलमध्ये दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
    या कार्यक्रमात जिल्हा परिषद स्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी सन 2011-12 साठी अशोक चौपाटे, विलास झिंगाडे, रमेश टेकाळे, प्रियंका चेडे, सचिन इतापे, सतिष सोमवंशी यांना तर सन 2012-13 साठीचा पुरस्कार रामेश्वर पाटील, सतिष तवले,शहाजी कागदे, तात्यासाहेब गोरे,मोहन करपूरे, नरेंद्र माने, उमाकांत जाधव आणि अर्जुन देवकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, राज्य परिवहन  महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ.राहूल मोटे, आ. राणा  जगजितसिंह पाटील,  आ. दिलीपराव देशमुख, आ. सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. ओमराजे निंबाळकर,  जिल्हाधिकारी डॉ. के. एम.  नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, विविध विषय समित्यांचे  सभापती धनंजय सावंत, दगडु धावारे, सविता कोरे तसेच  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     या कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार, कृषि विकास अधिकारी एम.एस. मिनीयार आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
 
Top