नांदेड -: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या बी.ए.एम.सी.जे. उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये नांदेड येथील उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविदयालयाचा 95 टक्के निकाल लागला आहे.
    मार्च-एप्रिल 2013 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठा अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविदयालयातील 75 पैकी 65 विदयार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून यामध्ये बी.ए.एम.सी.जे. प्रथम वर्षाचा विदयार्थी उमेश अर्धापुरे याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक सोमनाथ कांबळे व पौर्णिमा शिवनकर तर तृतीय क्रमांक गणेश ढाले यांनी पटकाविला आहे. द्वितीय वर्षातील शिला सरोदे हया विदयार्थीने प्रथम क्रमांक मिळविला असून द्वितीय क्रमांक संजीवनी सरोदे तर तृतीय क्रमांक चंद्रमुनी नरवडे यानी मिळविला आहे. तृतीय वर्षातील प्रथम स्वाती लांजेवार, द्वितीय प्रविण पैठणे, तृतीय मनिषा कोकरे यानी यश प्राप्त केले आहे. या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष आत्माराम मोरेपाटील, सचिव अनिल शेळके, प्राचार्य गणेश जोशी, मनोज मोरेपाटील, भास्कर पुयड, रघुनाथ कदम आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top