उस्मानाबाद : विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गुरुवार, दि. 27 जून एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत ग्रामसंवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  रायगड फंक्शन हॉल, येडशी रोड, उस्मानाबाद येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
    विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजनांची माहिती जिल्ह्यातील पत्रकारांना व्हावी. आणि त्यांच्या माध्यमातून ती जनतेपर्यंत जावी,  हा या कार्यशाळा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन विषयावर विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जाणार असून जिल्हा होमगार्ड दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार आहेत.
    याशिवाय सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, कृषी विषयक महत्वाच्या योजनांची माहितीही पत्रकारांना दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कक्ष क्र. २८, पहिला मजला, उस्मानाबाद (दूरध्वनी 02472-222744) अथवा पर्यवेक्षक अर्जुन परदेशी (9890324810)आणि श्री. मकरंद नातू (8554824788) यांच्याशी दि. २६ जून रोजी दुपारी एक वाजेपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top