उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या अवस्थेबद्दल तसेच आरोग्य सुविधा, आरोग्य केंद्रे यांच्या अवस्थेबद्दल वस्तुस्थिती जाणून घेतली. ज्याठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग नाहीत, त्या शाळांची तात्काळ दुरुस्तीचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम, आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारती खूप जुन्या आहेत. तसेच काही ठिकाणी शाळा इमारती मोडकळीस आल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोकादायक आहेत, त्या प्राधान्याने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेने अशा शाळांची यादी तयार केली असून प्राधान्यक्रमाने या शाळांची दुरुस्ती केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण आणि आरोग्य हे महत्वाचे मुलभूत घटक आहेत. या बाबींकडे जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही ना. चव्हाण यांनी व्यक्त केली.