तुळजापूर -: तुळजापूरच्या नगराध्यक्षपदासाठी विद्या दिलीप गंगणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी (दि. 28) नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली असून, याच दिवशी गंगणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
    विद्यमान नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांनी 15 जून रोजी त्यांचा पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत विद्या गंगणे यांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले. यावर सूचक म्हणून बाळासाहेब शिंदे, मंजूषा मगर, दयानंद हिबारे, रेखा कदम तर अनुमोदक म्हणून पंडित जगदाळे, अजित कदम, अश्विनी रोचकरी आणि नारायणराजे गवळी यांच्या अनुक्रमे स्वाक्षर्‍या आहेत. दुपारी 2 नंतर करण्यात आलेल्या छाननीत सर्व चार अर्ज वैध ठरले. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार व्ही. एल. कोळी, साहाय्यक म्हणून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी काम पाहिले. गंगणे यांचा अर्ज सादर करतेवेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोकुळ शिंदे, शहराध्यक्ष राजामामा भोसले, गटनेता नारायणराजे गवळी, उपनगराध्यक्षा अनिता साळुंके, नगरसेवक अफसर शेख, गणेश कदम, राजेश शिंदे, अण्णासाहेब अमृतराव, प्रकाश मगर, नितीन पाटील, विशाल कोंडो यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top