तुळजापूर -: श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन बसस्थानकात औरंगाबाद गाडीत चढत असताना महिलेच्या पर्समधून तीन तोळे वजनाचे सोन्याचे तोडे चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी तुळजापूर बसस्थानकात दुपारी साडं बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
नाशिक येथील सुरेखा सुरेश वाडेकर (40) या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी सोलापूर येथे गेल्या होत्या. तेथून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी त्या शुक्रवारी तुळजापूर येथे आल्या होत्या. दर्शन घेऊन बसस्थानकात परतल्यानंतर दुपारी 12.30 वाजता औरंगाबाद गाडी लागल्याने त्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यानी त्यांच्या पर्समधील तीन तोळै वजनाचे सोन्याचे तोडे चोरुन नेले.