उस्मानाबाद -: जिल्ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दि. 1 जून रोजी शहरातील पोलिस कवायत मैदानावर घोड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीसाठी राज्यातील विविध भागांतून घोडे दाखल होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
शनिवारी दुपारी 4 वाजता घोड्यांच्या शर्यतीचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शर्यतीबरोबरच जातीवंत घोडे, नाचणारे घोडे, असे वर्गीकरण करण्यात येणार असून, पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 21 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ग्वाल्हेर येथील विनोदानंद शास्त्री, डॉ. होनाळीकर, डॉ. शीतलकुमार मुकणे हे परिक्षक असतील, असे संयोजक मनोगत शिनगारे, डॉ. धीरज वीर यांनी सांगितले. ही शर्यत खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.