उस्मानाबाद :- टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी टंचाईग्रस्त भूम तालुक्यातील 21 गावाची निवड करण्यात आली असून या तालुक्यात 59 सिमेंट नालाबांध कामापैकी 49 कामे पुर्ण झाली आहे. टंचाईगग्रस्त भूम तालुक्यात सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी 639 लक्ष मंजूर असून  त्यापैकी 534.56 लक्ष रुपये खर्च झाले आहेत  व उर्वरीत  कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) विभाग, उस्मानाबाद यांनी दिली  आहे.
 
Top