
शहर व तालुक्यातील धनगर समाजाने यात सहभाग नोंदविला. महात्मा गांधी शॉपिंग सेंटरजवळ प्रतिष्ठापना केलेल्या अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आली. सकाळी उपळाई रोडवरील वायकुळे प्लॉट येथून माजी नगरसेवक शशिकांत वायकुळे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम वाळके, चंद्रकात वायकुळे उपस्थित होते. यानंतर उपळाई रोडवरुन पिवळ्या झेंड्यासह निघालेली दुचाकी वाहनांची भव्य रॅली 'येळकोट येळकोट, जय मल्हार' च्या घोषणा देत नेहरु चौक, महाद्वार चौक, पटेल चौक, तेलगिरणी चौक, बसस्थानक चौकातून सोलापूर रोडवर नेण्यात आली.
सचिन शेंडगे मित्रमंडळाच्यावतीने याठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर ही रॅली पुन्हा जुन्या पोष्ट चौकमार्गे पांडे चौकातून गांधी शॉपिंग सेंटरजवळ आणण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळातर्फे या ठिकाणी डॉ. चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते व निवृत्त तहसिलदार मदनराव वायकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी माणिकभाऊ वायकुळे, बसवराज कुंटोजी, बाळासाहेब पाटील, शिवाजी हाके, बिभीषण पाटील शेळगावकर, संजय पाटी, बापू गायकवाड, सुनिल सलगर, नवनाथ कसपटे, श्रीमंत थोरात, कासारवाडीचे सरपंच रवी यमगर, दत्तात्रय भोसले, बजरंग वाघमोडे, खंडेराव नरुटे, अरुण येळे, गणेश नान्नजकर, नवनाथ शेंडगे, अंबऋषी कोळेकर, शिक्षण मंडळ सदस्य सचिन गावसाने, शितल पाटील, गणेश चोरमुले, दीपक खरात, अमोल वायकुळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील धनगर समाज तसेच अहिल्यादेवी मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.