यावर्षी सर्वत्र दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या. हा दुष्काळ म्हणजे १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयंकर होता. मराठवाड्यासह संपुर्ण महाराष्ट्र पावसाची वाट पहात आसतानाच जुनच्‍या पहिल्याच दिवसापासुन मेघराजाचे आगमन झाले. त्‍यामुळे दुष्‍काळात होरपळणा-या शेतक-यांसह नागरिकांच्‍या चेह-यावर आनंद दिसत आहे. त्यातच या आनंदाला दुजोरा देणारा हवामान खात्याचा अंदाज की यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र समाधानकारक मेघराज बरसेल, या भाकीताप्रमाणे मेघराजाने बरसायला सुरुवात तर केली आहे. नेहमीच हुलकावणी देणारा मान्सुन यावर्षी वेळे आगोदर हजेरी लावुन दुष्काळाचे चटके विसारायला भाग पाडत आहे.
    गेल्यावर्षी म्‍हणावा तितका पाऊस न झाल्‍याने सर्वत्र तीव्र पाणी टंचाई जाणवल्‍याने एकच हाहाकार उडाला होता. सर्वसामान्य माणसाला या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या, मात्र जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यात सर्वत्र कमी अधिक पाऊस झाल्‍याने शेतकरी बी-बियाणे खरेदी करुन खरीप हंगामाच्‍या तयारीस लागल्‍याची लगबग दिसत आहे. मागच्या वर्षीच्या मानाने यावर्षी मोठ्या आशेने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. उरल्यासुरल्या शिलकेवर त्यात उसनेपासने करुन बी-बीयाण्याची व खताची व्यवस्था करण्यात मग्‍न आहे. एकंदरीतच यासर्व गोष्टी निसर्गावर अवलंबुन असून आपण मात्र प्रतिक्षा करण्याशिवाय काहीं करु शकत नाही. मात्र प्रचंड वृक्षतोड, विविध प्रदुषण या समस्येमुळे निसर्गाचे पर्यायाने पर्यावरणाचे समतोल ढासळत चालल्‍यानेच त्‍याचा परिणाम पाऊस काळावर झाला. त्‍यातूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्‍याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांतून बोलले जात आहे.
    पाऊस पडावे हे प्रत्येकालाच वाटते. परंतु निसर्गापुढे कोण काय करणार. आतापर्यंत संपुर्ण मराठवाडयाला दुष्काळाच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागल्या आहेत. यावर्षी तरी चांगला मेघराज बरसेल काय? असा प्रश्न अनेकांनाच पडला आहे. आता जुन महिन्याला सुरुवात झाली आहे. जुन महिना म्हटले की, पावसाळा सुरु झाला. जुन महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. सुरुवातीलाच मेघराजाने आपले आगमन केल्याने एकप्रकारचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतक-यांनी शेतातील कामे आटोपली आहेत, आता त्यांचे लक्ष लागुन आहे ते फक्त आभाळाकडे. मेघराज कधी येणार, आणि आपल्या शेतात कधी पेरणी करणार अशा आशा प्रत्येकजन करत आहे. सुरुवातीलाच मेघराजाने आपले आगमन जोरदार केल्याने प्रत्येकांच्या चेह-यावर अनंद ओसडून दिसत आहे. मग यावर्षी तरी चांगला ‘मेघराजा’ बरसणार का? असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे.

* सोमनाथ खताळ
 
Top