बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पिंपळवाडी (ता. बार्शी) येथील अनाधिकृत विहीरी खोदल्याने पाझर तलावाला धोका निर्माण झाल्याने अनेक वर्षापासून प्रलंबित होता. अनाधिकृत विहींरीच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांच्या मार्गदर्शनानंतर तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी अखेर बुजविण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण पिंपळवाडी गाव एकत्रपणे सदरच्या प्रकरणावर चिडल्याने मोठा संघर्ष निर्माण झाला. गावातील लोकांनी तहसिलदारांबरोबर, बांधकाम विभागात, पोलिसांत अनेक वेळा तक्रारी देवूनही अनाधिकृत विहीरीवर कसलही कारवाई झाली नाही. गावक-यांनी विविध प्रकारचे आंदोलने सुरु केल्याने तहसिलदार यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शाखा अभियंता पांडव यांनी ग्रामसभा घेतल्यावर एकमुखाने निर्णय झाल्यास यातून मार्ग निघेल व तातडीने विहीर बुजविण्यात येईल, असे सांगितले. ग्रामसभा झाली तरीही शासकीय टोलवाटोलवी झाल्याने ग्रामस्थ चिडले व संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तणावानंतर पोलीस उपअधिक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व बार्शी पोलिसांचे सुमारे शंभर जवान घटनास्थळी दाखल झाले. कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारचा उद्रेक होवू शकेल, याकरिता अग्निशमन दलाचे जवान व वाहन, आरोग्य विभागाची अँम्ब्युलन्स इत्यादी सर्व हजर झाले. यावेळी गावातील ग्रामपंचायतीजवळ लहान मुले, स्त्रिया व तरुणांसह मोठा जमाव जमा झाला. यावेळी तहसिलदार यानी सदरची बेकायदा विहीर बुजविण्यात येईल, असे तोंडी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी जल्लोष केला. परंतु काही वेळातच तहसिलदार यांनी त्वरीत आदेश काढून बांधकाम विभागाकडून ग्रामस्थांना लेखी दिल्याशिवाय वाहन जावू देणार नाही, अशी ताठर भूमिका घेवून गावातील महिलांनी पोलिसांच्या व तहसिलदारांच्या वाहनाला घेराव घातला. सदरच्या प्रकरणाला लवकर निकाली काढण्यसासाठी पोलीस उपअधिक्षक रोहिदास पवार यांनी पोलिसांचे वाहन पाठवून त्यांना पिंपळवाडीकडे लवकर जाण्यास सांगितले. तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर अभियंता पांडव यांचे आगमन झाले. यावेळी चिडलेल्या ग्रामस्थांन याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचे काय करायचे ते करतो, असे सांगितले. पोलिसांनी वेळीच ग्रामस्थांना समजावून सांगत जमाव शांत केला. शेवटी नाईलाजाने स्वतःच्या हस्ताक्षरात ग्रामस्थांना लेखी दिल्यानंतर त्यांची तेथून सुटका झाली.
यानंतर ग्रामस्थांनी तयार ठेवलेला जेसीबी तलावाच्या दिशेने नेला व विहीर बुजविण्याचा कार्यक्रम सुरु केला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तीन बेकायदा विहीरी असून यातील एक विहीर उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आहे. एका विहीरीला कोर्टाचा एक दिवसांचा स्टे तर उर्वरित एका विहीरीला बुजविण्याचे काम प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर सुरु झाले.