उस्मानाबाद -: किशोर अवस्थेच्या टप्‍प्‍यावर शारिरीक, मानसिक, भावनिक, लैगिंक, वैचारिक तसेच वागण्यातील बदलाची ही अवस्था 10 ते 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलीच्या दृष्टीने महत्वाची असते. त्यामुळे या काळात त्यांच्या अडचणीचे आकलन होऊन त्यांची शास्त्रीय दृष्टीकोनातून मार्गदर्शपर उत्तर मुला-मुलींना मिळाले तर याचा परिणाम घडून येतो. किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी अर्श कार्यक्रमातंर्गत मैत्री  क्लिनीक सुरु करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे दर शुक्रवारी 4-30 ते 5-30 वाजता, उपजिल्हा रुग्णालय, उमरगा, उपजिल्हा रुग्णालय, परंडा आणि ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर येथे प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि बुधवार वेळ 9-30 ते 12-30 अशा वेळा आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, कळंब येथेही नव्याने मैत्री क्लिनीक सुरु करण्यात आली आहे. तरी 10 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलीनी दिलेल्या वेळेत मैत्री क्लिनीकला भेट देऊन आपल्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांनी केले आहे.
    या क्लिनीक मध्ये तज्ञ डॉक्टरामार्फत किशोरवयीन मुलामुलीसाठी शारिरीक, मानसिक, भावनीक,लैगिंक आहार विषयक माहिती, समुपदेशन व सल्ला, विवाहपूर्व मार्गदर्शन, कुटूंब नियोजन साधने व वैद्यकीय तपासणी व उपचार तसेच माहितीची गोपनीयता या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत.            
 
Top