उस्मानाबाद -: जिल्ह्याचे कृषी हवामान विभागाचे धोरण निश्चित करण्यासाठी कृषी हवामान विभागनिहाय अभ्यासगटांच्या मार्गदर्शनाखाली दि .20 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्षता मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील कृषी विकासासंदर्भात आवश्यक त्या सूचना मांडण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीशील, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, आत्मा योजनेचे जिल्हास्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले आले आहे.
     या कार्यशाळेत नवीन कल्पना, योजना, उपक्रम, कृषि हवामान विभागासाठी पीक पध्दती, पिकांच्या जाती, लागवड पध्दती, पिक उत्पादन वाढीसाठी वापरावयाचे तंत्रज्ञान तसेच कृषी विभागातील विविध उपाययोजनांवर सविस्तर  चर्चा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील शेतक-यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
 
Top