सोलापूर :- जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या अध्यक्षतेखाली आज सेतू सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत समितीस प्राप्त झालेल्या 14 विविध तक्रारींवर चर्चा करण्यात आली. बैठकीस महसूल तहसीलदार अर्चना शेटे तसेच समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.