उस्मानाबाद :- माजी सैनिक तसेच दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांचया अडीअडचणी सोडविण्यासाठी महसूल सभागृह, उस्मानाबाद येथे दिनांक 19 जुन 2013 रोजी सकाळी 11-30 वाजता त्रैमासिक सैनिक दरबार व अशासकीय सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/ विधवांना व अवलंबितांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अडी अडचणी बाबतची निवेदने आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे दिनांक 18 जुन पर्यंत दोन प्रतीत सादर करावीत तसेच दरबाराचे वेळी समक्ष हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.