नळदुर्ग -: तुळजापूर विधानसभा युवक कॉंग्रेसच्‍या तालुका उपाध्‍यक्षपदी नळदुर्ग येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते समदानी बाबूभाई उर्फ अ.हुसेन कुरेशी यांची निवड करण्‍यात आली आहे. निवड झाल्‍याचे पत्र पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी दिले असून ही निवड ना. चव्‍हाण यांच्‍या आदेशावरुन तुळजापूर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्‍यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे. त्‍यांच्‍या निवडीबद्दल श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन तथा युवा नेते स‍ुनिलराव चव्‍हाण, कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, जि.प. अध्‍यक्ष डॉ. सुभाष व्‍हट्टे, उपाध्‍यक्ष संजय पाटील दूधगावकर, तालुका युवक कॉंग्रेस अध्‍यक्ष सचिन पाटील, विश्‍वासआप्‍पा शिंदे, नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार, माजी उपनगराध्‍यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शहबाज काझी, नळदुर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रणजितसिंह ठाकूर आदींनी कुरेशी यांचे अभिनंदन करुन शुभेच्‍छा दिले आहे.
 
Top