नळदुर्ग -: शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय समिती व पालकांच्या सहकार्याने शिक्षकांनी आवश्यक ती उपाययोजना शाळेत करावे, त्यास वेळोवेळी पालकांच्यावतीने मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विनायक अहंकारी यांनी दिले.
नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी व उर्दू शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व पाठपुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी अहंकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मदन घोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शिवाजी नाईक, विलास येडगे, लतीफ शेख, सुहास येडगे, इरफान काझी, सतीश राठोड आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे व पालकांचे शाळेच्यावतीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी प्रास्ताविकपर बोलताना मुख्याध्यापक संजय घंटे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व आरोग्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने शाळेला गेट बसविण्याचे आश्वासन दिले. यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघ, मधुकर घोडके, बेग अलताफ अली, छाया माने यांच्यावतीने शाळेला गेट बसविण्याच्या कामाकरीता म्हणून रोख रक्कम तीन हजार पाचशे रुपयेची मदत मुख्याध्यापकास देण्यात आले. या कार्यक्रमास मराठी, उर्दू शाळेचे विद्यार्थी, शालेय समितीचे अध्यक्ष शेख बशीर, सदस्य शेख मदिना, चंद्रकांत मुळे, साधन व्यक्ती गरड डी.के., सोनकांबळे पी.बी., भास्कर वाघमारे, कलिम शेख, सुनिल हत्ते, मंगेश चंदेले यांच्यासह पालक व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस. बनसोडे यांनी तर आभार विनायक अहंकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कडगंचे एम.एस., सुरवसे एम.टी., डोंगरे आर.ए., शेख एम.यू., गायकवाड एम.एन., कापसे आर.डी., शिपाई वाघमारे डी.एम., उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अखलाक ए.एम., श्रीमती दखनी एस.ए., श्रीमती शेख ए.झेड., आदींनी परिश्रम घेतले.